राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या घरासमोर सोलापूरच्या भाजपचे आंदोलन

शेतकरी अडचणीमध्ये असताना शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप शेतकरी करु लागले आहे.
Protest
ProtestSakal

वालचंदनगर : महावितरणची सुरु असलेली शेतकऱ्यांच्या वीज पंपाची वीज तोडणी मोहिम थांबविण्यासाठी सोलापूर जिल्हातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी भरणेवाडी (ता.इंदापूर) येथील राज्यमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या घरासमोर आंदोलन करुन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन सरकारचा निषेध केला.

महावितरणने इंदापूर तालुक्यासह सोलापूर जिल्हामध्ये वीज बिल थकलेल्या शेतकऱ्यांची वीजतोडणी माेहिम वेगाने सुरु केली आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांची वीज तोडल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. विहिरीमध्ये पाणी असून ही वीज नसल्यामुळे शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिके जळू लागली आहेत. शेतकरी अडचणीमध्ये असताना शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप शेतकरी करु लागले आहे.

Protest
''मोदी सरकारची निवडणूक ऑफर लवकरच संपणार; टँक फुल्ल करा''

तसेच दोन दिवसापूर्वी सोलाूपर जिल्हातील पंढरपूर तालुक्यातील सूरज रामा जाधव या युवकाने महावितरणने विद्युत पंपाचे वीज कनेक्शन तोडल्याच्या कारणावरुन फेसबुक लाईव्ह करीत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहे. सोलापूर जिल्हातील वीज पुरवठा सुरळीत करावा तसचे सुरज जाधव यांच्या आत्महत्येच्या घटनेचा निषेध करण्यासाठी साेलापूर जिल्हातील भाजपच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करुन महाविकास आघाडी सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

यावेळी शेतकऱ्यांनी अमर रहे...अमर रहे, सुरज जाधव अमर रहे...,शेतकऱ्यांच्या खुन करणाऱ्या आघाडी सरकारचा धिक्कार असो...,महसूली सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय या सारख्या घोषणा दिल्या. आंदोलनामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, बाळासाहेब सलगर,माउली हळणावरकर, गणेश चिवटे, शशिकांत चव्हाण, ताई खडके, माया माने,योगेश बोबडे, लक्ष्मण धनवडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com