लॉकडाउनमुळे सामान्यांचे किचन बजेट कोलमडणार; भाज्यांसह फळांच्या दरात...

market yard1.jpg
market yard1.jpg

मार्केट यार्ड (पुणे) :  सोमवारी रात्री पासून शहरात लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याने मार्केट यार्डात फळभाज्या खरेदीसाठी किरकोळ विक्रेते व ग्राहकांनी
खरेदीसाठी गर्दी केली होती परिणामी मार्केटयार्डात भाज्यांचा तुटवडा जाणवला त्यामुळे सर्वच भाज्यांच्या भावात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

मार्केटयार्डात रविवारी ९० ते १०० ट्रक इतकी शेतमालाची आवक झाली. परराज्यातून आलेल्या मालामध्ये हिमाचल प्रदेशातून २ टेम्पो मटार, कर्नाटक, गुजरातहून ४ टेम्पो
कोबी, इंदौरहून ७ टेम्पो गाजर, कर्नाटक, आंध्रप्रदेश आाणि गुजरातहून ८ ते १० टेम्पो शिमला मिरची, कर्नाटकातून श्रावणी घेवडा २ टेम्पो, आग्रा इंदौरहून २७ ते २८ ट्रक बटाटा, मध्यप्रदेश आणि गुजरात येथून लसूण ७ ते ८ ट्रक इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले ८०० ते ९०० पोती, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो ६०० ते सातशे क्रेट्स, कोबी ४ ते ५ टेम्पो, सिमला मिरची ७ ते ८ टेम्पो, कांदा ४५ ते ५० ट्रक, इतकी आवक झाली आहे.

आषाढामुळे कोथींबीर वगळता पालेभाज्यांना मागणी कमी सद्या आषाढ महिना सुरु असल्याने मासळी आणि मटन, चिकण आणि अंड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे केवळ कोथींबीर वगळता इतर सर्वच पालेभाज्यांना मागणी कमी होती मात्र किरकोळ बाजारात त्या चढ्या दराने विकल्या जात होत्या.


फळांना मोठी मागणी

उद्यापासून शहरात लॉकडाऊन होणार आहे त्यामुळे बहतांश फळांना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होती. संत्रा, मोसंबी, डाळींब, कलिंगड, खरबूज, चिक्कू या फळांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. सिताफळ, पपई आणि लिंबांच्या भावात घट झाली आहे तर खरबूज, डाळींब आाणि चिक्कूचे भाव वाढले आहेत. रविवारी येथील बाजारात केरळ येथून अननस २ ट्रक, मोसंबी १० टन, संत्री २ टन, डाळिंब ८० ते १०० टन, कलिंगड १५ ते २० टेम्पो, खरबूज १० ते ३० टेम्पो, पपई २५ ते ३० टेम्पो, लिंबे अडीच ते तीन हजार गोणी, चिक्कू शंभर बॉक्स, सीताफळ पाच ते सहा टन आवक झाली.
 

फुलांची आवक वाढली मात्र भावात निम्म्याने घसरण

गेल्या काही दिवसांपासून फुलबाजार सुरु झाला आहे़. बाजार सुरळीत होत असतानाच पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय जाहीर झाला आहे. त्यामुळे रविवारी मार्केटयार्डात फुलांची आवक दुपटीने वाढली मात्र ग्राहकच नसल्याने भावात निम्म्याने घसरण झाली असल्याचे आखिल फुल बाजार अडते असोसिएशन चे अध्यक्ष अरुण वीर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com