kerosene oil
sakal
पुणे - सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्य शासनाने शिधापत्रिकेवरून रॉकेल देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिलिटर ६२ रुपये या दराने हे रॉकेल उपलब्ध करून दिले जाणार आहे. शासनाकडून कमी पुरवठा झाल्याने नगरपालिका क्षेत्र वगळण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे केवळ ग्रामीण भागातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनाच या रॉकेलचा पुरवठा केला जाणार आहे.