इंधन दरवाढीची झळ होणार कमी; येत्या काही दिवसांत किंमत उतरणार

Fuel price hikes will be less and the price will come down in the next few days
Fuel price hikes will be less and the price will come down in the next few days

पुणे : इंधन दरवाढीने हैराण असलेल्या पुणेकरांना येत्या काही दिवसांत दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांत इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झालेली नाही. तर या महिन्यात किंमत कमी होऊ लागली असून पुढील आठवड्यात दर आणखी कमी होण्याची शक्‍यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर शहरातील इंधनाच्या किमती झपाट्याने वाढल्या होत्या. 1 जून रोजी 78.09 रुपये प्रतिलिटर असलेले पेट्रोल ऑगस्ट अखेरीस 88.44 रुपयांपर्यंत पोचले होते. म्हणजे गेल्या तीन महिन्यात पेट्रोल 10.35 रुपयांनी वाढले आहे. तर या काळात डिझेल 11.68 रुपयांनी महागले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर झालेली पगार कपात, नोकरीची हमी नाही, उद्योग व्यवसायात झालेले नुकसान नागरिक सहन करीत आहे. त्यात सतत इंधन दरवाढ झाल्याने नागरिकांना दुहेरी फटका सहन करावा लागत होता. पूर्वीच्या तुलनेत आता परिस्थिती सुधारली असली तरी इंधनावर होणारा खर्च कमी झाला नव्हता. मात्र या महिन्याच्या सुरवातीपासून काहीसा दिलासा मिळण्यास सुरवात झाली आहे. एक सप्टेंबरपासून आजपर्यंत पेट्रोल 46 पैशांनी कमी झाले आहे. तर डिझेल 1.03 रुपयांनी उतरले आहे.

कच्चा तेलाची किंमत 40 डॉलर प्रतिबॅरल 
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या बॅरलाचा दर 40 रुपयांच्या घरात आहेत. पुढील आठवड्यापर्यंत हे दर 36 डॉलरपर्यंत खाली येतील, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे. तसे झाल्यास पेट्रोल डिझेलची किंमत पुढील काही दिवसांत सुमारे पाच रुपयांनी कमी होण्याची शक्‍यता आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंधनाची किमती
महिना 1 जून 1 जुलै 1 ऑगस्ट 1 सप्टेंबर 15 सप्टेंबर
पेट्रोल 78.009 86.89 86.89 88.50 87.98
डिझेल 66.99 77.35 78.67 78.51 77. 64
सीएनजी 53.80 54.80 54.80 54.80 54.80


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रती बॅरल 36 डॉलरपर्यंत खाली येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे देशातील इंधनाचे दर कमी होतील. मात्र दर अचानक कमी होणार नाहीत. ज्याप्रमाणे ते वाढत गेले तसेच ते कमी होणार आहेत.
- अली दारूवाला, प्रवक्ते, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन 
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com