पुण्यात इंधन दरवाढीचा दर सुसाटच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

मागील महिन्याभराचा विचार करता गेल्या आठ दिवसात पेट्रोलचे दर अत्यल्प प्रमाणात वाढले आहेत. २२ जून रोजी पेट्रोल ८६.०६ रुपये प्रति लिटर होते. ते आज ८६.८९ रुपये आहे. तर ७५.७९ रुपये प्रति लिटर असणारे डिझेल आता ७७.३५ वर जाऊन पोहोचले आहे. पेट्रोलच्या तुलनेत या आठ दिवसांत डिझेलची किंमत १.५६ रुपयांनी तर पेट्रोल ८३ पैशांनी वाढली आहे.

पुणे - गेल्या महिनाभरापासून सुसाट सुटलेल्या इंधन दरवाढीच्या गाडीचा वेग गेल्या आठ दिवसांत काहीसा मंदावला आहे. मात्र, दरवाढ सुरूच आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मागील महिन्याभराचा विचार करता गेल्या आठ दिवसात पेट्रोलचे दर अत्यल्प प्रमाणात वाढले आहेत. २२ जून रोजी पेट्रोल ८६.०६ रुपये प्रति लिटर होते. ते आज ८६.८९ रुपये आहे. तर ७५.७९ रुपये प्रति लिटर असणारे डिझेल आता ७७.३५ वर जाऊन पोहोचले आहे. पेट्रोलच्या तुलनेत या आठ दिवसांत डिझेलची किंमत १.५६ रुपयांनी तर पेट्रोल ८३ पैशांनी वाढली आहे. गेल्या आठवड्यात २४ जून रोजी पेट्रोलच्या दरात वाढ झाली नाही. याबाबत ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी म्हणाले, ‘‘देशात इंधनाची मागणी एकदम वाढली आहे. यामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत.

रिंगरोडचा पहिला टप्पा बीओटी तत्त्वावर; महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा निर्णय

मात्र गेल्या आठवड्याभरात दर मोठ्या प्रमाणात वाढलेले नाहीत. त्यामुळे गेल्या आठवड्याचा विचार करता या आठवड्यात दर आणखी स्थिर होण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. एक जूनपासून आजपर्यंत पेट्रोलची किंमत ८ रुपये ८ पैशांनी वाढली तर डिझेल १० रुपये ३६ पैशांनी महागले आहे.

आठ दिवसांत वाढलेले दर
डिझेल - १.५६ रुपये 
पेट्रोल - ८३ पैसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fuel Rate Increase in pune