

फरार राठोडला
भारतात आणले
नवी दिल्ली : आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी विशाखा राठोड हिला संयुक्त अरब अमिरातीतून (यूएई) भारतात आणण्यात आले आहे. ‘सीबीआय’ने राठोडला तीन ऑगस्टला पुण्यात आणल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी तिचा ताबा घेतल्याची माहिती बुधवारी जाहीर करण्यात आली. ‘सीबीआय’ने परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या सहकार्याने ही कारवाई केली. राठोड हिने इतर साथीदारांच्या मदतीने गुंतवणूकदारांना दरमहा निश्चित परताव्याचे खोटे आमिष दाखवून विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले होते. त्यानंतर तिने या निधीचा अपहार करून तो विविध बँक खात्यांमध्ये आणि डिमॅट खात्यांमध्ये वळवला, असा आरोप आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या विनंतीवरून सीबीआयने विशाखा राठोडविरुद्ध इंटरपोलची ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी केली होती.
-----
लोकसभा सचिवालयात
संचालकाची आत्महत्या
नोएडा : लोकसभा सचिवालयात काम करणाऱ्या संचालकाने नोएडा येथील एका गृहनिर्माण संस्थेतील आपल्या सदनिकेत गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळावरून मृत्युपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी जप्त केली असून, त्यामध्ये कर्जाचा उल्लेख असल्याचे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. गौरव गौतम (वय ४०) असे या संचालकाचे नाव आहे. गौतम यांची पत्नी माहेरी गेली होती. घरी परतल्यानंतर त्यांना घराला कुलूप असल्याचे दिसले. काहीतरी अघटित घडल्याचा संशय आल्याने त्यांनी सुरक्षा रक्षकाच्या मदतीने घरात प्रवेश केला. त्यावेळी पती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी तातडीने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.