
पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांच्याकडून वैकुंठ स्मशानभूमित अंत्यविधी केले जातात. तसेच विद्युत, गॅस दाहिनीऐवजी लाकडावरच अंत्यविधी करावेत यासाठी आग्रह धरला जात आहे. शुक्रवारी अंत्यविधी केल्यानंतर शनिवारी त्यांच्या अस्थी संकलन न करता रविवारी केले जाते. त्यामुळे शनिवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जागा मिळत नसल्याने दोन ते तीन तास प्रतिक्षा करावी लागत आहे. अशा वेळी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी राखीव असलेले शेड उपलब्ध करून घेण्यासाठी वशिला लावावा लागतो.