
किरकटवाडी : उपचारांअभावी हवेली तालुक्यातील खानापूर व किरकटवाडी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा घरीच मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्याबाबत स्पष्ट निर्देश नसल्याने मृतदेह कित्येक तास तसेच पडून होते. 'ई-सकाळ' च्या माध्यमातून या गंभीर प्रश्नाबाबत आवाज उठविण्यात आल्यानंतर हवेली तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन खरात यांनी घरी मृत्यू होणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामपंचायत व महसूल प्रशासन यांची जबाबदारी निश्चित करत आदेश जारी केले आहेत. सरपंच,तलाठी ,पोलीस पाटील, ग्रामसेवक/ ग्राम विकास अधिकारी, आरोग्य सेवक, व बीट हवलदार यांच्यावर अंत्यसंस्काराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी दिनांक 10 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार संबंधित गावचे सरपंच, कामगार तलाठी व पोलीस पाटील यांच्यावर अंत्यसंस्काराचे स्थळ निश्चित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ग्रामसेवक किंवा ग्राम विकास अधिकारी व तलाठी यांनी शव नेण्यासाठी वाहन, स्ट्रेचर ,शव बॅग, कापड,पीपीई किट, सॅनिटायझर, जळाऊ लाकडे व इतर साहित्य खरेदी करायचे आहे. मृत व्यक्तीचे घर व अंत्यसंस्काराच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन व वैद्यकीय अहवाल तयार करण्याची जबाबदारी आरोग्य सेवकावर देण्यात आली आहे. अंत्यसंस्कार करताना संबंधित गावाच्या बीट हवलदारांवर कायदा व सुव्यवस्था टिकविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
तसेच या आदेशानुसार कोणत्याही परिस्थितीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. ज्या गावांमध्ये शवाचे दहन करण्यासाठी दोन जागा उपलब्ध आहेत त्या गावातील एक शव दाहीनी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या व्यक्तींसाठी राखून ठेवण्यात यावी असे आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच मृतदेहाचे दफन करायचे असल्यास लोकवस्ती पासून एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरची जागा निवडण्यात यावी व मृतदेह दफन करताना निर्जंतुकीकरणची पद्धतही स्पष्ट करण्यात आली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ग्रामपंचायत प्रशासन, कामगार तलाठी व पोलीस पाटील यांनी परस्पर समन्वयाने अंत्यसंस्काराबाबत ठरवून दिल्याप्रमाणे कार्यवाही करावयाची आहे. ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी किंवा अंत्यसंस्कार करणाऱ्या व्यक्तींनी पीपीई किट व इतर सर्व खबरदारी घेत अंत्यसंस्कार करावयाचे आहेत. महानगरपालिके प्रमाणे ग्रामीण भागासाठी अंत्यसंस्काराची स्वतंत्र यंत्रणा नसल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. -प्रशांत शिर्के, गटविकास अधिकारी, हवेली.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.