Pune News : बुरशी आलेल्या गोळ्या पुरविल्या; ग्राहकाला मिळणार एक लाखांची नुकसान भरपार्इ

औषधे तक्रारदारांना २२ सप्टेंबर २०१९ ला एका सीलबंद पाकिटातून मिळाली. मात्र औषधाच्या दहा गोळ्यांच्या पाकिटातील दोन गोळ्यांचा रंग गेला होता.
fungal pills provided customer will get compensation of Rs one lakh
fungal pills provided customer will get compensation of Rs one lakhSakal

Pune News : ऑनलार्इन ऑर्डर दिल्यानंतर ग्राहकाला रंग गेलेल्या आणि बुरशी आलेल्या गोळ्या पुरविणाऱ्याला ऑनलार्इन गोळ्यांची विक्री करणाऱ्या कंपनीला महागात पडले आहे. ग्राहकाला एक लाख रुपये नुकसान भरपार्इ आणि तक्रार खर्च म्हणून पाच हजार रुपये द्यावा, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे.

आयोगाचे अध्यक्ष जयंत देशमुख, सदस्या प्रणाली सावंत आणि शुभांगी दुनाखे यांनी हा निकाल दिला. याबाबत पंकज जगसिया यांनी मॅक्लिओड्स फार्मास्युटिकल्स लिमिटेड व कंपनीचे संचालक, दाढा ॲण्ड कंपनी, नेटमेड्स डॉट कॉम आणि प्लॅनेट फार्मा वेअरहाऊस प्रा.लि यांच्याविरोधात आयोगात तक्रार दाखल केली होती.

तक्रारदार यांनी www.netmeds.com या संकेतस्थळावरून त्यांच्या कुटुंबीयांसाठी काही औषधे मागविली होती. ही औषधे तक्रारदारांना २२ सप्टेंबर २०१९ ला एका सीलबंद पाकिटातून मिळाली. मात्र औषधाच्या दहा गोळ्यांच्या पाकिटातील दोन गोळ्यांचा रंग गेला होता. तसेच त्यांना बुरशी आली होती. तक्रारदारांनी या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली होती.

तक्रारदार यांनी त्या गोळ्या आपल्या ७२ वर्षांच्या आईसाठी मागवल्या होत्या. सदोष औषधे पुरविली म्हणून सर्व जाबदारांच्याकडून नऊ लाख ५० रुपयांची नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून पाच हजार रुपये मिळावे, अशी मागणी तक्रारदारांनी आयोगाकडे केली होती.

मॅक्लिओड्स फार्मास्युटिकल्स लिमिटेड व कंपनीचे संचालक, दाढा ॲण्ड कंपनी हे या प्रकरणात हजर झाले नाहीत, तर नेटमेड्स डॉट कॉम आणि प्लॅनेट फार्मा वेअरहाऊस प्रा.लि यांनी मुदतीत आपला जबाब मांडला नाही. त्यामुळे आयोगाने एकतर्फी निकाल देत प्रकरण निकाली काढले.

औषधांचा दर्जा सांभाळला नाही

तक्रारदार यांना बुरशी असलेली सदोष औषधे मिळाल्याचे अन्न व औषध प्रशानासनाच्या अहवालावरून सिद्ध झाले होते. औषधासारख्या नागरिकांच्या जीवनाशी निगडित असलेल्या उत्पादनांबाबत जाबदेणार यांनी आवश्यक ती दक्षता घेतली नाही. तसेच औषधांचा अपेक्षित असलेला दर्जा सांभाळला नाही, असे निकालात नमूद आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com