फुरसुंगी: पावसामुळे फुरसुंगीतील खड्ड्यांची समस्या पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. पावसाने उघडीप दिली असल्याने येथील खड्ड्यांवर नगरपरिषदेने योग्य उपाययोजना करून रस्ता सुरक्षित करावा, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे..मागील आठवड्यात पाच दिवस सलग पाऊस झाल्याने येथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. भेकराईनगर बस डेपोच्या मागील बाजूस साई मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. पावसात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहत असल्याने वाहनचालकांना अंदाज येण्यासाठी नागरिकांनी मोठे दगड ठेवले होते..Maharashtra Farmers: पेरलं, पण उगवलंच नाही! बोगस सोयाबीन बियाण्यांनी हजारो शेतकरी अडचणीत.सध्या पाऊस थांबला आहे. खड्डे लांबूनही दिसत आहेत. मात्र हे दगड अजूनही याच ठिकाणी आहेत. हे दगड वाहनचालकांना अडचणीचे ठरत आहेत. दगड हटवून रस्ता सुरक्षित करणे गरजेचे आहे..सायंकाळी महिला भाजीपाला घेण्यासाठी बाहेर पडत असतात. जवळच तीन खाजगी शैक्षणिक संकुले आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची या मार्गावर वर्दळ असते. येथील खड्ड्यांमुळे वाहतूक संथ होऊन काही प्रमाणात कोंडी होत असते..E20 नको असेल तर जास्त पैसे मोजून शुद्ध पेट्रोल घेऊ शकता; इथेनॉल मिश्रित पेट्रोल वादावर गडकरींचा वाहनधारकांना सल्ला.खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी अपघात होण्याच्या शक्यता वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाने एखादी गंभीर घटना घडण्यापूर्वी येथील खड्डे बुजून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी येथील रहिवासी लक्ष्मीकांत हजारे यांनी केली आहे.."येथील रस्त्याची पाहणी करण्यात येईल. या मार्गावरील दगड हटवण्यात येईल. तसेच डांबरीकरण करून रस्ता वापरण्यायोग्य आणि सुरक्षित करण्यात येईल."- प्रणव सस्ते, कनिष्ठ अभियंता, पथ विभाग, फुरसुंगी नगरपरिषद.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.