फुरसुंगीतील मुख्यमंत्री पेयजल योजना रखडली

फुरसुंगीतील मुख्यमंत्री पेयजल योजना रखडली
Published on: 

फुरसुंगी, ता. ५ : निधीअभावी फुरसुंगीतील ‘मुख्यमंत्री पेयजल योजना’ गेल्या एक वर्षापासून बंद पडली आहे. कचरा डेपोबाधित फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांसाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली होती. मात्र, १० वर्षे उलटूनही काम अपूर्ण असल्याने नागरिकांना आजही विकतच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
नगरपरिषद स्थापनेनंतर ही योजना जलदगतीने पूर्ण होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. निवडणूक काळात लोकप्रतिनिधींनी याबाबत आश्वासने दिली होती, मात्र प्रत्यक्षात प्रशासकीय पातळीवर हालचाली मंदावल्या आहेत. सध्या योजनेचे काम अर्धवट ठेवून जुन्या वितरण व्यवस्थेद्वारेच पाणीपुरवठा केला जात आहे. विशेषतः कचरा डेपोला लागून असलेल्या भागातील नागरिक, ज्यांना या योजनेची सर्वाधिक गरज आहे, तेच पाण्यापासून वंचित आहेत. प्रशासनाने या रखडलेल्या योजनेचे काम तातडीने सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता रावसाहेब जगधने म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री पेयजल योजना नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्यात आली असल्याने याबाबत नगरपरिषद काम पाहत आहे.’’

यावर्षी पाऊस कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती आहे. त्यातच योजना पूर्ण नसल्याने पाणी विकतच घ्यावे लागणार आहे. विकतच्या टँकरचे भाव गगनाला भिडतील. आर्थिक घडी विस्कळीत होणार आहे. समतोल कसा साधायचा हेच समजत नाही. नगरपरिषद केवळ कंत्राटांमध्ये गुंग आहे. पाण्यासारख्या अत्यावश्यक सुविधेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही.
- शुभांगी हरपळे, स्थानिक महिला, फुरसुंगी

योजना हस्तांतरित केल्याचे अद्याप पत्र मिळाले नाही. याबाबत अजून बैठक होणे बाकी आहे. पूर्णपणे योजना हस्तांतरित झाल्यानंतर त्यावर काम करता येईल.
- प्रसाद जगताप, उपअभियंता, नगरपरिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com