पुढील पिढ्यांना पाण्याचे महत्व कळले पाहिजे : गजेंद्र सिंग शेखावत

ganjendra-singh-shekawat.jpg
ganjendra-singh-shekawat.jpg

खडकवासल(पुणे) : "पूर्वी आपण पाण्याला देव मानत होतो. म्हणून पाण्याजवळ जाऊन राहत होतो. नवीन युगात पाणी दररोज आपल्या घरी येत असल्यामुळे पाण्याचे महत्व कमी झाले. शहरीकरण वेगाने होत असल्याने भूगर्भातील पाण्याचा अतिरिक्त वापर वाढला आहे. आता आपल्याला पाण्याची किंमत कळली आहे. ती पुढील पिढ्यांना देखील समजली पाहिजे म्हणून पाण्याच्या बाबतीत सर्वांनी जबाबदारीने काम करण्याची गरज आहे." असे मत केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी व्यक्त केले.

खडकवासला येथील राष्ट्रीय जल प्रबोधिनीतील केंद्रीय जल अभियांत्रिकी सेवेच्या नवनियुक्त अधिकाऱ्यांसाठीच्या 31व्या प्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी शेखावत बोलत होते. यावेळी अध्यक्ष अरुण सिन्हा, जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनर्जीवन विभागाचे सचिव उपेंद्र सिंह, आयोगाचे मुख्य अभियंता  योगेश दैठणकर आणि प्रबोधिनीचे संचालक एस. एन. पांडे या वेळी उपस्थित होते.

देशाच्या काही भागात पूरस्थिती काही भागात दुष्काळ असतो त्यामुळे काही भागात पिण्याचे पाण्याचे संकट असते. मागील महिन्यात चेन्नईत पाणी टंचाई होती. देशातील संपूर्ण पाणी संपले आहे. अशा प्रकारच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर एक महिनाभरात सगळीकडे पाण्याचे पूर आला आहे. राजस्थानमधील माझ्या जोधपूर मतदार संघात पूर आल्याने 70 रस्ते बंद झाले होते. पावसाचे पाणी भूगर्भात साठवून ठेवण्याची गरज आहे. असे सांगून शेखावत म्हणाले, "आपण धरणांमध्ये पाणी साठवतो त्यापेक्षाही दीडपट जास्त पाणी भूगर्भात साठवतो. धरणातील पाण्याबरोबर भूगर्भातील देखील पाण्याचा आपण अतिरिक्त वापर करीत आहे. स्वच्छता अभियान, हर घर शौचालय या सारख्या उपक्रमांची मदत घेतल्यामुळे भुगर्भातील स्वच्छ पाणी साठण्यास मदत होत आहे."

परिवर्तनाचे तुम्ही भागीदार
शेखावत म्हणाले, "सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून परिवर्तन होत आहे. परिवर्तनाच्या या लाटेमध्ये प्रत्येकाने आपापला सहभाग दिला पाहिजे. अभियांत्रिकी शिक्षण घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन तुम्ही या ठिकाणी जल संवर्धन व जल सुरक्षा करण्याच्या दृष्टीने काम करणार आहेत. पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला देशात जाऊन तुम्ही प्रत्यक्ष काम करणार असल्याने तुम्ही या परिवर्तनाचे साक्षीदार आहेत. 

महाराष्ट्रात उत्तम काम
मोदी यांनी जलशक्ती अभियानांतर्गत 256 दुष्काळी जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांना  पाठवून विद्यापीठ, शाळा यांच्या माध्यमातून पारंपरिक स्रोत व भूगर्भातील पाणी साठविण्याची काम हाती घेतले आहे. यासंदर्भात एका संस्थेच्या माध्यमातून पाणी बचत, पाणी साठवणे याबाबत 67 हजार शाळेतील मुलांना  प्रशिक्षण दिले जात आहे त्याबद्दल त्यांनी कौतुक केले. असे ही शेखावत यांनी सांगितले. 


जल प्रबोधिनी मुख्य संस्था
राष्ट्रीय जल प्रबोधिनीतील ही जलसंपदा क्षेत्रातील प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण करणारी मुख्य संस्था आहे. यास जलसंपदा क्षेत्रातील व्यावसायिक तसेच जल क्षेत्रातील सर्व भागधारकांचे प्रशिक्षण आणि क्षमता वाढवण्याची जबाबदारी सोपविली आहे. असे ही शेखावत यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com