
Pune: तुम्ही इयत्ता अकरावीच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहात! आणि अद्याप अर्जाचा भाग दोन लॉक केलेला नाही. अहो, मग चिंता करू नका. तुम्ही अर्जाचा भाग एक लॉक केला असेल आणि अर्जाचा भाग दोन भरणे किंवा लॉक करणे बाकी असेल तर शनिवारी दुपारी साडे बारा वाजेपर्यंत तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहात. होय, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने ही माहिती दिली आहे.