
पुणे : उदाहरण पहिले : दहावीच्या परीक्षेत श्वेता पाटील (नाव बदललेले आहे) हिला ९२ टक्के गुण मिळूनही अद्याप अकरावीच्या प्रवेशासाठी पसंतीचे महाविद्यालय मिळू शकलेले नाही. उदाहरण दुसरे : श्वेताप्रमाणेच अथर्व देशमुख (नाव बदललेले आहे) याला दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण असून, त्यालाही अद्याप पसंतीचे महाविद्यालय मिळू शकलेले नाही. अथर्वने तर पुण्यातील ‘सर्वोत्तम दहा’मध्ये नसलेल्या आणि गेल्या वर्षी विज्ञान शाखेचा कट-ऑफ ६९ टक्के असणाऱ्या महाविद्यालयाला प्राधान्य दिले आहे. मात्र, तरीही अथर्वला प्रवेशासाठी महाविद्यालय मिळालेले नाही.