G20 Pune summit : उकडीचे मोदक, पुरणपोळी अन्‌ सुरळीची वडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

G20 Pune summit : उकडीचे मोदक, पुरणपोळी अन्‌ सुरळीची वडी

पुणे : पुणेकरांचा आवडता वडापाव, तर्रीबाज मिसळपासून ते अगदी भरपूरच तूप टाकलेली पुरणपोळी, उकडीचे मोदक, मसालेदार कोल्हापुरी मटण रस्सा, मजबूत मुरलेली साजूक तुपातील बिर्याणी, सुरळीची वडी, कोथींबीर वडी अशा अस्सल मराठमोळ्या खाद्यपदार्थांबरोबरच पंजाबी पनीर टिक्का, दक्षिण भारताचा इडली डोसा अशा एक ना अनेक भारतीय खाद्यपदार्थांची चव ‘जी २०’ परिषदेत सहभागी विविध देशातील प्रतिनिधींच्या जिभेवर रेंगाळणार आहे. भारतीय व्यंजनांबरोबरच पाहुण्यांच्या देशातील खास खाद्यपदार्थही उपलब्ध होणार असून सुग्रास भोजन ठेवण्याची काळजी घेतली जात आहे.

पुण्यात १६ व १७ जानेवारी रोजी ‘जी २० परिषद’ होत आहे. या परिषदेत अमेरिका, इंग्लंड, युरोपियन युनियन, अर्जेंटिना, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, जपान, चीन, ब्राझील, मेक्‍सिको, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, तुर्कस्तान व यजमान भारत असे जगभरातील २० देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

ही परिषद यशस्वी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून महिनाभरापासून रात्रंदिवस सुशोभीकरण, रंगरंगोटी, साफसफाई अशा कामांवर भर दिला आहे. त्यामुळे विमानतळ ते सेनापती बापट रस्ता, औंध ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दरम्यानचा राजभवन रस्ता, गणेशखिंड रस्ता, जंगली महाराज

कडधान्य वर्षानिमित्त खास पदार्थ

यंदा ‘कडधान्य वर्ष’ असल्याने त्यादृष्टीने डोसे, सॅंडवीच व अन्य पदार्थ तयार केले जाणार आहेत. तर ‘गाला डीनर’मध्ये पुरणपोळीसह देशातील विविध राज्यांतील प्रसिद्ध खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे.

विविध देशांतील ‘शेफ’ पुण्यात दाखल

जी २० परिषदेतील सहभागी विविध देशांच्या प्रतिनिधींच्या खानपानाची सरबराई व्यवस्थित व्हावी, यासाठी भारताच्या विविध भागांतील पंचतारांकित हॉटेल्ससह विविध देशांमधील प्रसिद्ध शेफ पुण्यात दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून बनविण्यात येणाऱ्या विविध खाद्यपदार्थांची चव ‘जी २०’ परिषदेतील पाहुण्यांच्या जिभेवर रेंगाळणार आहे.