हेड ‘लोकबिरादरी’च्या पाखरांची पुन्हा भरारी

हेड
‘लोकबिरादरी’च्या पाखरांची पुन्हा भरारी
Published on

सकाळ वृत्तसेवा
गडचिरोली, ता. १४ : कधीकाळी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम गावांत रानपाखरांसारखी जगणारी मुले उच्च शिक्षणाचे स्वप्नसुद्धा पाहू शकत नव्हती. पण ज्येष्ठ समाजसेवक डाॅ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांनी निर्माण केलेल्या ‘लोकबिरादरी’ नावाच्या घरट्याने या मुलांच्या पंखांना बळ दिले. हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पातील आश्रमशाळेद्वारे चालविण्यात येणाऱ्या ‘लोकसाधना सेंटर फॉर एक्सलन्स इन हायर स्टडीज’ या उपक्रमातील आठ विद्यार्थ्यांनी ‘एमबीबीएस’च्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवीत मोठे यश संपादन केले आहे.

या विद्यार्थ्यांची बाजी
- ४ ः अनुसूचित जमाती
- २ ः अनुसूचित जाती
- १ ः भटक्या- विमुक्त
- १ ः इतर मागास घटक

उपक्रमातून निवड
- गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये अधिकाधिक प्रवेश मिळावा, या हेतूने ‘लोकबिरादरी’ प्रकल्पातर्फे ‘लोकसाधना सेंटर फॉर एक्सलन्स इन हायर स्टडीज’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

मोफत प्रशिक्षण
- येथे गरजूंना नीट (NEET) प्रवेश परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते. हे विद्यार्थी गरीब घरचे असून, रूपेश ताडो, भामरागड तालुक्यातील भटपार या अतिदुर्गम भागातील रहिवासी आहे. त्याच्या गावी जाण्यासाठी अद्याप रस्ता नाही. भ्रमणध्वनीच्या जाळ्याचाही विस्तार झालेला नाही.

कुटुंबातील पहिलेच सदस्य
- आता उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थी हे त्यांच्या कुटुंबातील पहिलेच सदस्य असतील. डॉ. प्रकाश आमटे हे आमची प्रेरणा असून, त्यांच्या प्रमाणेच आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजसेवेसाठी करणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.
‘लोकबिरादरी’ प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, त्यांची पत्नी तथा प्रकल्पाच्या शिक्षण संचालक समीक्षा आमटे या ‘लोकसाधना सेंटर फॉर एक्सलन्स इन हायर स्टडीज’मधील मुलांच्या यशासाठी प्रयत्न करत आहेत.

या आठजणांची भरारी
- पराग चौधरी (बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे)
- ओम सिडाम (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संभाजीनगर)
- रूपेश ताडो (एचबीटी अँड डॉ. आर. एन. कूपर मेडिकल कॉलेज, अंधेरी, मुंबई)
- अंजली कंडेला (श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज, धुळे),
- राजेश जाडी (श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज, धुळे),
- क्रिष्णवेनी वेलादी (अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज, सोलापूर),
- करण अजमेरा (सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ मेडिकल कॉलेज, कुडाळ, सिंधुदुर्ग),
- तुषार मेश्राम (सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ मेडिकल कॉलेज, कुडाळ, सिंधुदुर्ग)


प्रतिक्रिया
समीक्षाचे मार्गदर्शन अन् शिक्षकांची मेहनत मी जवळून पाहिली आहे. या विद्यार्थ्यांची रोज १५-१६ तास अभ्यास करण्याची तयारी होती आणि त्यामुळे हे यश त्यांच्या पदरी पडले. हेच भावी डॉक्टर गडचिरोलीतील आरोग्य सेवा-सुविधा सक्षम करतील.
- अनिकेत आमटे, संचालक ‘लोकबिरादरी’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com