

गडचिरोलीतील गौरव संमेलनात
पंतप्रधानांचा आभासी सहभाग
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १४ : गडचिरोली येथे रविवारी (ता. १५) होणाऱ्या जनजातीय गौरव संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी मार्गाने सहभाग घेणार आहेत. धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास देखील पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मोदी यांच्या हस्ते यावेळी तीन हजार कोटी रुपयांच्या २४६ विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली जाईल. आदिवासी भागातील शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, लोकांचे जीवनमान सुधारण्याच्या दृष्टीने या योजना राबवल्या जाणार आहेत.
पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम-जनमन) या योजनेअंतर्गत शंभर बहुउद्देशीय केंद्रांची स्थापना केली जाणार आहे. याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करतील. सेवा वितरण आणि नागरिकांशी संबधित घडामोडींचे काम या केंद्रांच्या माध्यमातून होणार आहे. याशिवाय आदिवासी विद्यार्थ्यांसाठी १७३ प्रकल्पांची सुरुवात केली जाणार आहे. यात ३८ एकलव्य आदर्श निवासी शाळांचा समावेश आहे. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पांचे उद्घाटन देखील मोदी करतील. अन्य प्रकल्पांमध्ये अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे स्थापण्यात आलेल्या आदिवासी संशोधन संस्थेच्या प्रकल्पांची सुरुवात मोदी यांच्या हस्ते होईल. शिवाय मिझोराम येथील रोपूईलियानी आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.