तीन बळी घेणारी वाघीण पहाटे ३ वाजता जेरबंद

तीन बळी घेणारी वाघीण पहाटे ३ वाजता जेरबंद
Published on: 

gadchiroli waghin वारात
गडचिरोली : बेशुद्ध केलेल्या वाघिणीसोबत वन विभागाचे पथक.

तीन बळी घेणारी वाघीण
गडचिरोली जिल्ह्यात जेरबंद

धास्तावलेल्या नागरिकांना अखेर मोठा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
गडचिरोली, ता. १३ : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात जारावंडी परिसरात तीन जणांचे बळी घेणाऱ्या ‘जी-२५ एसएएफ’ या तीन वर्षांच्या वाघिणीला शुक्रवारी (ता. १३) पहाटे पाच वाजता वनविभागाच्या पथकाने शिताफीने बेशुद्ध करून पकडण्यात यश मिळविले. एटापल्ली तालुक्यात काही महिन्यांपासून या हल्लेखोर वाघिणीच्या हल्ल्यांनी धास्तावलेल्या नागरिकांना अखेर मोठा दिलासा मिळाला.

भामरागड वन विभागातील कसनसूर वनपरिक्षेत्राच्या जारावंडी क्षेत्रामधील वडसकला बीट, कक्ष क्रमांक १ येथे ही कारवाई करण्यात आली. या वाघिणीला पकडल्यानंतर कसनसूर वनपरिक्षेत्र कार्यालयात हलविण्यात आले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या शीघ्र कृतिदलाने ही मोहीम राबविली. पशुवैद्यकीय अधिकारी तथा पथकप्रमुख डॉ. रविकांत खोब्रागडे, शूटर अजय मराठे यांच्यासह योगेश लकाडे, दीपेश तेंभुर्णे, वसीम शेख, विकास ताजणे, प्रफुल्ल वटगुरे, अमोल कोरपे, अक्षय दांडेकर आणि गुरुनानक ढोरे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. कसनसूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वनराज नगराळे यांनी १५ दिवसांत वाघाचा बंदोबस्त करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. जेरबंद केलेल्या या वाघिणीला जेरबंद केल्यानंतर झालेल्या प्रमाणित संचालन प्रक्रिया किंवा मानक कार्यप्रणाली (एसओपी) बैठकीत हल्लेखोर वाघिणीला नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

चार महिन्यांत तिघांना केले ठार

या वाघिणीने मागील चार महिन्यांत एटापल्ली तालुक्यात तीन जणांना ठार केले होते. १६ ऑगस्ट रोजी दोलंदा येथील हरी बोहरण वड्डे (वय ५७), १९ ऑक्टोबर रोजी इरपनपायली येथील विलाशी आनंद बा (वय ७०) तर २ नोव्हेंबर रोजी दिंडवी येथील सदाशिव झिटू दुग्गा (वय ६०) यांच्यावर हल्ला करून ठार केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.