भारत इथेनॉल निर्यात करणारा देश झाला पाहिजे

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी; श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्यावर सी. बी. जी. गॅस प्रकल्पाचे उद्घाटन
सी. बी .जी .गॅस प्रकल्पाचे उद्घाटन करताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, विनोद तावडे, पांडुरंग राऊत, विकास रासकर, हरिभाऊ बागडे, व मान्यवर.
सी. बी .जी .गॅस प्रकल्पाचे उद्घाटन करताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, विनोद तावडे, पांडुरंग राऊत, विकास रासकर, हरिभाऊ बागडे, व मान्यवर.Sakal

राहू - साखर कारखान्यांनी साखरेचे उत्पादन कमी करून उसापासून इथेनॉल, सी. बी. जी. गॅस निर्मितीवर तसेच इतर उपयोग प्रकल्प उभारण्यावर कारखान्यांनी अधिकाधिक भर द्यावा. साखर कारखानदारांनी काळाची पावले ओळखून सद्यस्थिती नुसार बदलले पाहिजेत. म्हणजेच भविष्यात साखर उद्योगासाठी अडचणी निर्माण होणार नाही. भारत आयात करणारा देश होण्यापेक्षा निर्यात करणारा देश झाला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय कॅबिनेट रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी केले. पाटेठाण (ता. दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्यावतीने नव्याने उभारण्यात आलेल्या सी. बी. जी. (कॉम्प्रेस बायोगॅस गॅस) प्रकल्पाचे उद्घाटन व कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांच्या अमृत महोत्सव वाढदिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, भविष्यात पेट्रोल-डिझेलच्या वाहने कोणीही खरेदी करू नये. ग्रीन हायड्रोजन हे देशाच्या ऊर्जेची गरज पूर्ण करणारे इंधन असून याकडे लक्ष देण्याची साखर कारखानदारांनी गरज आहे. साखर कारखानदारांनी आपापल्या परिसरामध्ये जास्तीत जास्त इथेनॉलचे पंप सुरू करावे. शंभर टक्के इथेनॉलवर तसेच इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने बाजारात मोठ्या प्रमाणात येणार आहे. इथेनॉलच्या वापरामुळे प्रदूषण कमी होऊन व तरुणांना रोजगार मिळेल. शेतकरी हा खरा अन्नदाता आहे. शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार असून भविष्यात भारत आर्थिक महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही असे गडकरी यांनी सांगितले.

पांडुरंग राऊत म्हणाले ,गडकरी यांच्यामुळेच कारखानदारीला योग्य दिशा मिळाली. कारखान्याच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना मला न्याय देता आला. कारखान्याला जनसेवा बँक व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह इतर बँकांनीही खूप सहकार्य केले. भविष्यात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यावर अधिक भर देऊ. कारखान्याच्या प्रगतीमध्ये सर्व कामगार, अधिकारी, व ऊस उत्पादक शेतकरी शेतकऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.

याप्रसंगी माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कारखान्याचे कार्याध्यक्ष विकास रासकर, उपाध्यक्ष बबनराव गायकवाड, सुहास हिरेमठ, प्राज इंडस्ट्रीजचे प्रमोद चौधरी ,आमदार राहुल कुल, आमदार अशोक पवार, माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, महेश भागवत, महेश करपे, अनिल भुजबळ, सुमंत महाराज हंबीर, सुरेश महाराज साठे, माधव राऊत, प्रदीप जगताप, जगदीश कदम, प्रदीप कंद, योगेश ससाने अनिल बधे, पांडुरंग कदम, किसन शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर , पी.एम.मते. यांच्यासह सर्व संचालक मंडळ व प्रवर्तक मंडळ ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गुणवंत कामगार ,गुणवंत ऊस तोडणी वाहतूकदार, चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. एक एकरांमध्ये 100 टनांहून ज्यादा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कारखान्याच्या वतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकी विभागाला 'फिरता करंडक' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक कारखान्याचे कार्याध्यक्ष विकास रासकर यांनी केले. सूत्रसंचालन भालचंद्र कुलकर्णी यांनी केले. आभार कारखान्याचे उपाध्यक्ष बबनराव गायकवाड यांनी मानले.

पांडुरंग राऊत यांचे कार्य समाजहिताचे

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत भविष्यातील काळाची पावले ओळखून साखर कारखानदारीला उपप्रकल्पाची जोड देत प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यावर भर देत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com