
पुण्यातील सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. गायकवाड बाप-लेकाच्या वकीलांनी अमरावती कारागृहाचे तत्कालीन उपमहानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यावर ५०० कोटी रुपये खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाने पुण्यातील राजकीय आणि पोलिसी वर्तुळात खळबळ उडवली असून, याप्रकरणी चौकशीची मागणी जोर धरत आहे.