High Court Allows Gajanan Marne Temporary Entry to Pune
पुणे : कुख्यात गुंड गजानन मारणेला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५ आणि १६ जानेवारीला शहरात येण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. मारणे याच्यावर यापूर्वी दाखल असलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमुळे त्याच्यावर पुणे शहर आणि जिल्ह्यात प्रवेशबंदी घालण्यात आली होती. निवडणुकीच्या निमित्ताने मर्यादित कालावधीसाठी आणि न्यायालयाने दिलेल्या अटींच्या अधीन राहून ही परवानगी देण्यात आली आहे.