

पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रथमेश मारणे याच्यावर सिंहगड रोड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून त्याने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.
दरम्यान एका मुलीशी ओळख वाढवून तीच्याशी मैत्री केली आणि शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार मुलीने केली आहे. तसेच त्याने अश्लील व्हिडिओ काढून तिला धमकी दिल्याचं सदर मुलीने तक्रारीत म्हटलंय.
दरम्यान याबद्दल अधिक माहिती अशी की, आरोपी हा फिर्यादीच्या कॉमन मित्रांपैकीच होता. आरोपीने सदर मुलीबरोबर ओळख वाढवून तीला खडकवासला धरण येथे फिरायला घेऊन गेला. येताना एका हॉटेलवर थांबवून तीच्याबरोबर जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पुणे बंगळूर हायवेवरील राजगड हॉटेल, मुळशी अशा ठिकाणी नेऊन तीच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले आणि चोरुन अश्लील व्हिडिओ शूट केले. हे व्हिडिओ डीलीट करण्याबाबत विचारल्यावर त्याने टाळाटाळ केली.
त्यानंतर फिर्यादीने या कृत्याबाबत पोलिसांत फिर्याद देण्याचे सांगितल्यावर त्याने तीला धमक्या दिल्या. आणि काय करायचे ते कर मी कुणाला घाबरत नाही असे उडवाउडवीचे उत्तर दिले. तसेच अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस स्टेशन येथे भा.द.वि. कलम ३७६, ५०४, ५०६ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रमाणे कलम ६६ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पुढील तपास पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.