
Baramati राज्यातील महत्वाच्या जिल्हा परिषदांपैकी एक असलेल्या पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गजानन पाटील यांनी कार्यभार स्विकारला आहे. संतोष पाटील यांची बदली झाल्याने रिक्त झालेल्या या पदावर गजानन पाटील यांची नियुक्ती झाली आहे.
गेली काही वर्षे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपसचिव व सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांना पुणे जिल्ह्याचा सखोल अभ्यास असून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना या अनुभवाचा त्यांना चांगला फायदा होणार आहे.