कुख्यात गुंड गज्या मारणे याला १२ दिवसांची पोलीस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुख्यात गुंड गज्या मारणे याला १२ दिवसांची पोलीस कोठडी

कुख्यात गुंड गज्या मारणे याला १२ दिवसांची पोलीस कोठडी

शेअर दलालाचे २० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी गुंड गजानन उर्फ गज्या मारणे याला गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सातारा जिल्ह्यातील वाई परिसरातून ताब्यात घेतलं आहे. शेअर दलालाचे अपहरण प्रकरणात गज्या मारणेसह १४ साथीदारांच्या विरोधात गु्न्हा दाखल केल्यानंतर मारणे फरार झाला होता. त्यानंतर मारणेसह साथीदारांच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे.

दरम्यान आता गजानन मारणे याला २९ ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाई येथून ताब्यात घेतल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला आणि त्याच्या इतर साथीदाराला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं होत. त्यानंतर आज कोर्टाने त्याला १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कुख्यात गुंड गजानन मारणेला पुणे पोलिसांनी साताऱ्यातील वाई जवळच्या ॲड.विजयसिंह ठोंबरे यांच्या फार्महाऊसवरून ताब्यात घेण्यात आले होते. गजानन मारणे यांच्यावर खंडणी, अपहरण प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती. ॲड. विजयसिंह ठोंबरे पाटील यांना फार्महाऊस वर भेटण्यासाठी आला असताना पुणे पोलिसांनी ही कारवाई केली होती.

टॅग्स :policepunecrime