Revenue Assistant : गलांडवाडी ठरले अधिकाऱ्यांचे गाव; तिघांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षेमध्ये यशाला घातली गवसणी

गलांडवाडी नंबर एक (ता. इंदापूर) येथील तिघांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशाला गवसणी घातली.
Anjali Waghmare, Puja Galande and Akshay Shingate
Anjali Waghmare, Puja Galande and Akshay Shingatesakal
Updated on

इंदापूर - गलांडवाडी नंबर एक (ता. इंदापूर) येथील तिघांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशाला गवसणी घातली असून, दोघांची कर सहाय्यक, तर एकीची महसूल सहायकपदी निवड झाली. विशेष बाब म्हणजे, यामधील दोघींचे पालक हमाल, तर एकाचे पालक वाहन चालक आहेत.

त्यांनी जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी घालत पालकांसह आपल्या गावाचे नाव मोठे केले. यामध्ये महसूल सहाय्यक अधिकारीपदी अंजली विठ्ठल वाघमारे हिची, तर पूजा मोहन गलांडे व अक्षय अप्पा शिंगटे यांची कर सहाय्यकपदी निवड झाली आहे. त्यामुळे आता गलांडवाडी हे अधिकाऱ्यांचे गाव बनले आहे.

इंदापूर शहरापासून पश्चिमेला पाच किलोमीटर अंतरावर पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेले गलांडवाडी नंबर एक हे गाव पूर्वी शेतकरी, मजूर, हमाल व कामगारांचे गाव म्हणून ओळखले जात होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविताना शिक्षणाकडे कुणाचाही फारसा कल नव्हता.

परंतु, उजनी धरण झाल्यानंतर सन १९८०पासून उजनीचे पाणलोट क्षेत्र झाल्यानंतर बागायती शेती, तसेच त्यानंतर परिसरात कर्मयोगी कारखाना व सोनाई दूध संघ झाल्यानंतर गावात सुबत्ता निर्माण होऊ लागली. याचा परिणाम शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करीत या गावात हळूहळू सहा कृषी सहाय्यक, विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक झाले.

त्यानंतर शिक्षणाचे महत्त्व गावास अधिक पटायला लागले. त्यानंतर नवीन युवक पिढीनेही अपार मेहनत आणि कष्ट याच्या जोरावर अधिकारी होऊन अधिकाऱ्यांचे गाव म्हणून गावाची ओळख निर्माण केली. यामध्ये नुकत्याच निकाल जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षेने भर पडली आहे.

यात गावातील तिघांनी नेत्रदीपक यश संपादन केले. यामध्ये हमाली करणाऱ्या मोहन ज्ञानदेव गलांडे यांची मुलगी पूजा हिने, तसेच हमालीच करणाऱ्या अप्पा सुखदेव शिंगटे यांचा मुलगा अक्षय यांनी सहाय्यक कर अधिकारीपदाला गवसणी घातली. तर, सोनाई दूध संघाच्या वाहनावरती चालक म्हणून काम करणारे विठ्ठल वाघमारे यांची कन्या अंजली हिने सहाय्यक महसूल अधिकारी पदाला गवसणी घातली. त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com