कोल्हापूर: हरोलीत गळीत धान्य पिकांवरील शेतकरी प्रशिक्षण वर्ग

कोल्हापूर: हरोलीत  गळीत धान्य  पिकांवरील शेतकरी प्रशिक्षण वर्ग
Published on

हरोलीत गळीत धान्य
पिकांवरील शेतकरी प्रशिक्षण वर्ग

ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : हरोली (ता. शिरोळ) येथे कृषी विभाग व आत्मा विभागाच्या वतीने राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-गळीत धान्य विकास कार्यक्रमांतर्गत शेतकरी प्रशिक्षण वर्ग झाला.
उद्घाटन पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी हरोलीचे सरपंच तानाजी माने होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या प्रचिता कोळी व पंचायत समिती सदस्य नीलम म्हेत्रे उपस्थित होत्या. प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील यांनी केले, तर स्वागत तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे यांनी केले.
वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार विजेते प्रवीण माळी यांनी गळीत धान्य पिकांवरील रोग व किडी, जैविक कीड नियंत्रण उपाययोजना तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर अंकुश पाटील यांनी घरच्या घरी खते तयार करण्यासाठी विविध निविष्ठा तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
चे नियोजन आत्मा एटीएम कीर्तिकुमार पाटील सहायक कृषी अधिकारी सीमा खारकांडे यांनी केले. सूत्रसंचालन उपकृषी अधिकारी संजय सुतारयांनी केले. यावेळी उपकृषी अधिकारी संपतराव मुळीक, रविकांत माने, कृषी मित्र संदीप गावडे, युसुफ कुरणे, पिंटू झोले उपस्थित होते. आभार मंडळ कृषी अधिकारी महेंद्र जगताप यांनी मानले.

कोल्हापूर : हरोली (ता. शिरोळ) येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-गळीत धान्य विकास अभियानात बोलताना पोपट पाटील शेजारी तानाजी माने यांच्यासह मान्यवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com