गर्भगिरी महादेव मंदिरात ९०० किलो वजनाच्या त्रिशूलाची प्रतिष्ठापना

गर्भगिरी महादेव मंदिरात ९००  किलो वजनाच्या त्रिशूलाची प्रतिष्ठापना
Published on

KEG26A02491
अहिल्यानगर ः भिंगार जवळील गर्भगिरी महादेव मंदिरात तब्बल ९०० किलो वजनाच्या पोलादी त्रिशूळाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

९०० किलो वजनाच्या त्रिशूळाची प्रतिष्ठापना
नगर तालुका, ता. १९ ः श्रावण महिन्याचे औचित्य साधून भिंगार, नागरदेवळे तसेच परिसरातील मोरे-परभणे वस्ती, ब्रह्मनगर व रतडगाव येथील शिवभक्तांच्या वतीने गर्भगिरी महादेव मंदिरात तब्बल ९०० किलो वजनाच्या व सुमारे ३५ फुटी पोलादी त्रिशूळाची प्रतिष्ठापना करण्यात आली. गर्भगिरी महादेव मित्र मंडळ तसेच स्थानिक भक्तांच्या पुढाकारातून हा धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथून तयार करण्यात आलेले हे भव्य त्रिशूल भिंगार शहरातून वाजतगाजत मिरवणुकीने गर्भगिरी महादेव मंदिरात नेण्यात आले. विजयनगर-संभाजीनगर मित्र मंडळांच्या वतीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. सोमवारी सकाळी त्रिशूळाची विधिवत पूजा व प्रतिष्ठापना करण्यात आली. या धार्मिक सोहळ्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Ujjain 84 Mahadev Yatra Opens for Devotees in Shravan New Spiritual Circuit Inaugurated by Chief Minister
Barabanki Lodheshwar Dham Tourism Project Ancient Pandav Kund to Get High Tech Infrastructure and Facilities
agra kailas shiv mandir
Marathi News Esakal
www.esakal.com