esakal | बंगल्यात जुगार खेळणाऱ्या 20 जणांवर कारवाई, दिड लाखांचा ऐवज जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

बंगल्यात जुगार खेळणाऱ्या 20 जणांवर कारवाई, दिड लाखांचा ऐवज जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाचा (Corona) प्रादूर्भाव कायम असतानाही एका बंगल्यात एकत्र येऊन जुगार (Gambling) खेळणाऱ्या 20 जणांवर शनिवारी मार्केट यार्ड पोलिसांनी (Police) कारवाई (Crime) केली. त्यांच्याकडून रोख रक्कम व दुचाकी असा दिड लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. (Gambling Crime Police in Pune)

मार्केट यार्ड येथील विद्यासागर कॉलनीतील विपुल बंगल्यामध्ये अवैधरीत्या जुगार खेळला जात असल्याची खबर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली होती. त्यानुसार, संबंधीत ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्याच्या सुचना वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनघा देशपांडे यांना देण्यात आल्या होत्या. शनिवारी दुपारच्या सुमारास देशपांडे या पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या. त्यावेळी विपुल बंगल्याच्या दरवाजाला बाहेरुन कुलूप होते. खिडकीतुन पाहणी केली, तेव्हा 10 ते 20 जण आतमध्ये जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

हेही वाचा: पुणे शहरात शनिवारी ७२ केंद्रांवर कोरोना लसीकरण

पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली, त्यावेळी हर्षल पारेख नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरुन संबंधीत व्यक्ती तेथे जुगार खेळण्यासाठी एकत्र आल्या होत्या. त्यानंतर "मी तुम्हाला जेवण आणून देतो' असे सांगून पारेखने बाहेरुन कुलूप लावल्याचे त्यांनी सांगितले. देशपांडे यांच्या पथकाने दरवाजा उघडून तेथे छापा टाकला. त्यावेळी त्यांच्याकडुन जुगाराचे साहित्य, 54 हजार रुपयांची रोकड, एक लाख रुपये किंमतीच्या चार दुचाकी असा दिड लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यांच्याविरुद्ध संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, बेकायदेशीररीत्या जुगार खेळणे व विनामास्कप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

loading image
go to top