esakal | पुण्याचा गणपती काश्‍मीरच्या लाल चौकात ! 
sakal

बोलून बातमी शोधा

Hutatma Babu Genu's Ganapati in Kashmir's Lal chowk

महाराष्ट्र आणि काश्‍मीर यांचे नाते दृढ करणारे आणि प्रेमाचे प्रतीक मानला जाणाऱ्या गणेशोत्सवास श्रीनगरच्या लालचौकात सुरवात झाली. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाने उत्सवासाठी गणेशमूर्ती दिली आहे. गणेश चतुर्थीला सायंकाळी स्थानिक मराठी हिंदू आणि मुस्लिम नागरिकांच्या उपस्थितीत बाप्पांची प्रतिष्ठापना केली

पुण्याचा गणपती काश्‍मीरच्या लाल चौकात ! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र आणि काश्‍मीर यांचे नाते दृढ करणारे आणि प्रेमाचे प्रतीक मानला जाणाऱ्या गणेशोत्सवास श्रीनगरच्या लालचौकात सुरवात झाली. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाने उत्सवासाठी गणेशमूर्ती दिली आहे. गणेश चतुर्थीला सायंकाळी स्थानिक मराठी हिंदू आणि मुस्लिम नागरिकांच्या उपस्थितीत बाप्पांची प्रतिष्ठापना केली. 

श्रीनगरमध्ये तीन दशकांहून अधिक काळापासून गणेशोत्सव साजरा होतो. त्यासाठी सांगलीतून दरवर्षी गणेशमूर्ती पाठविली जाते; परंतु पूरस्थितीमुळे मूर्ती पाठविण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या; परंतु, "सरहद'च्या संजय नहार यांनी पुढाकार घेत हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर दरवर्षी मंडळाकडून मूर्ती बसविली जाते, तशी मूर्ती काश्‍मीरमधील गणेशोत्सवासाठी पाठविली. 

जम्मू काश्‍मीर विषयाचे अभ्यासक संजय सोनावणी हे गणेशमूर्ती घेऊन गेले. तेथील लाल चौक परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिरात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अमित वांछू, जम्मू काश्‍मीरच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव पांडुरंग पोळ तसेच हिंदू-मुस्लिम नागरिकांनी मोठ्या उत्साहात "गणपती बाप्पा मोरया'चा घोष करीत या उत्सवास सुरवात केली. अनंत चतुर्दशीचा उत्सवही मोठ्या उत्साहात केला जाणार आहे. 

वांछू यांनी सांगितले की, लालचौक परिसरात सुवर्णकारांची बाजारपेठ आहे. तेथे कुशल कारागीर हे सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्रीय आहेत. तसेच बंगाली आणि पंजाबी लोकही आहेत. ते सहा दशकांपासून येथे राहतात. त्यांनी एकत्र येत गणेशोत्सव सुरू केला. गेल्या 37 वर्षांपासून तो अखंडितपणे सुरू आहे. गणेश स्थापनेसाठी काल ज्या पद्धतीने मुस्लिम बांधव सहभागी झाले. तसेच अनेक वर्षांपासून ते यात सहभागी होतात. महाराष्ट्र आणि काश्‍मीरच्या प्रेमाचे प्रतीक आणि दोन राज्यांना जोडणारा बंध म्हणून या उत्सवाकडे पाहिले जाते.'' 

सांगलीतील पुरामुळे यावर्षी गणेशमूर्ती मिळते की नाही, अशी शक्‍यता होती; परंतु सरहद आणि बाबू गेनू गणेश मंडळाच्या पुढाकाराने मूर्ती श्रीनगरमध्ये आली आणि या उत्सवास सुरवात झाली. काश्‍मीरने अनेक दहशतवादाची अनेक संकटे झेलली आहेत; पण या उत्सवात कधीही खंड पडला नाही,'' असे वांछू यांनी सांगितले. 

सांगली जिल्ह्यातील पुरामुळे गणेशमूर्ती काश्‍मीरला गेली नाही; पण या उत्सवात खंड पडू नये, अशी इच्छा होती म्हणून आम्ही मंडळाच्या वतीने बाप्पांची मूर्ती पाठविली. त्याची प्रतिष्ठापना होऊन हा उत्सव सुरू झाला, याचा मनापासून आनंद आहे. 
- बाळासाहेब मारणे (अध्यक्ष, हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट) 
 

loading image
go to top