
पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याने केलेल्या उद्धट वर्तनामुळे न्यायालयाचा अवमान झाला. त्यामुळे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. जी. आर. डोरणपल्ले यांनी आरोपीला सात दिवसांचा कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.