उपनगर - गणेशोत्सव जोड

उपनगर - गणेशोत्सव जोड
Published on

चिंचवडगावात मंत्रोच्चारात विधी
चिंचवड : चिंचवडगावातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणेश चतुर्थीनिमित्त मंगळवारी (ता. १४) धार्मिक वातावरणात गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विविध धार्मिक विधी पार पडले. ढोल-ताशांचा गजराने परिसर भक्तिमय झाला.
गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या गणरायाची प्राणप्रतिष्ठापना दुपारी साडेअकरा वाजता शशी लुणावत यांच्या हस्ते राहुल कुलकर्णी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. हेदवी येथील सुप्रसिद्ध दशभुजा लक्ष्मी गणपतीची प्रतिकृती असलेली दहा हातांची मूर्ती विशेष आकर्षण ठरली. ढोल-ताशांच्या गजरात गणरायाच्या आगमन सोहळा पार पडला.
भोई आळी येथील उत्कृष्ट तरुण मंडळाच्या ‘भोई आळीचा राजा’ गणरायाची प्राणप्रतिष्ठा बेलसरे गुरुजी यांच्या हस्ते सायंकाळी सात वाजता झाली. मंत्रोच्चार, अथर्वशीर्ष पठण आणि आरतीने परिसर भक्तिमय झाला. चार फूट फायबरच्या कायमस्वरूपी मूर्तीसह विसर्जनासाठी दोन फूट शाडू मातीची मूर्ती ठेवण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज मंडळाच्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा सायंकाळी सात वाजता प्रकाश खटावकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. शाडू मातीच्या राजेशाही गणेशमूर्तीचे पूजन, कलश स्थापना, मंत्रोच्चार,अभिषेक व आरती करण्यात आली. अखिल मंडई मित्र मंडळाच्या चार फूट उंच ‘शारदा गजानन’ गणरायाची प्राणप्रतिष्ठा सराफ व्यावसायिक शिरीष कटारिया यांच्या हस्ते झाली.

एक दिवस आधीच मिरवणूक
दळवीनगर येथील समता मित्र मंडळाने यंदा गणेशोत्सवाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करताना गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी धनेश्वर, तांडव आणि उद्योगनगर ढोल-ताशा पथकांच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. गणेश चतुर्थीच्या दिवशी इतर मंडळांच्या मिरवणुकीमुळे अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रथमच हा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

 India’s second public Ganeshotsav in Kashi
Ganesh Chaturthi 2026 Sthapana Guide: How to Perform Ganpati Pranpratishtha at Home Without a Guruji
Ganesh Idol Broken News
Hartalika Ganesh Chaturthi
Marathi News Esakal
www.esakal.com