

कोथरूड, ता. १४ : कोथरूडमध्ये झांज, ढोल, ताशाच्या गजरात उत्साहाने गणेशाचे आगमन झाले. पारंपारिक पद्धतीने घरोघरी गणेशाचे स्वागत करण्यात आले.
एसएनडीटीजवळील जयदीप मित्र मंडळाने ब्रास बँड आणि शेडाणीतील ढोल लेझीम पथकाच्या तालसूरांवर वाजत गाजत गणरायाची प्रतिष्ठापना केली. समस्त गावकरी मंडळ कोथरूड, संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळ, अखिल भुसारी कॉलनी विकास मंडळ ट्रस्ट, भुसारीचा महाराजा असलेले श्री गणेश मित्र मंडळ, अखिल गौर बंजारा समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, संगम तरुण मंडळ ट्रस्ट, संघर्ष मित्र मंडळ, हमराज मित्र मंडळ, नवभूमी मित्र मंडळ, श्री साई मित्र मंडळ ट्रस्ट, अमर तरुण मंडळ, संयुक्त गुजरात कॉलनी, समाज सुधारक मित्र मंडळ, मुठेश्वर मित्र मंडळ, आझादनगर मित्र मंडळ, विठ्ठल ऋख्मीणी सेवा मंडळ, अखिल हनुमाननगर, बालयुवक, अष्टविनायक, जयहिंद, विश्वशांती, आदर्श, क्रांतीवीर, एकता, समता, श्री शनी मारुती गणेशोत्सव मंडळ, देशप्रेमी मित्र मंडळ, ओंकार मित्र मंडळ, गणेश नगर मंडळ, बाल तरुण मंडळ, श्री साई मित्र मंडळ आदी मंडळामध्ये जल्लोषात गणेशाचे आगमन झाले.
दरम्यान, आम्ही कोकणकर फाऊंडेशनच्यावतीने कोकणवासीयांना गावी जाण्यासाठी तीन बसची व्यवस्था करण्यात आली. कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयदेखील उत्सवासाठी तयार असून निर्माल्य संकलन, मूर्ती दान आणि विसर्जनासाठी १८ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव करावा, असे आवाहन कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सुहास जाधव यांनी यावेळी केले.