विद्युत महामंडळाच्या दुर्लक्षामुळे होळेतील शेतकऱ्याचे मोठे नुकसान शॉर्टसर्किटने उसाच्या शेताला आग; भरपाईचा प्रश्न कायम

विद्युत महामंडळाच्या दुर्लक्षामुळे होळेतील शेतकऱ्याचे मोठे नुकसान शॉर्टसर्किटने उसाच्या शेताला आग; भरपाईचा प्रश्न कायम

Published on

KRU26B02580
व्होळे (ता. माढा) ः गणेश दत्तात्रय चोपडे यांच्या शेतात शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग व झालेले नुकसान.

महावितरणच्या दुर्लक्षामुळे व्होळेतील ऊस जळाला
कुर्डू ः होळे खु (ता. माढा) येथील शेतकरी गणेश दत्तात्रेय चोपडे यांच्या शेतामध्ये शुक्रवारी डीपी लाइनच्या तारांमध्ये स्पार्क होऊन तार तुटली आणि उसाच्या शेताला आग लागली. या आगीत सुमारे एक एकर ऊस पूर्णपणे जळून खाक झाला. शेतामधील ड्रीपसिंचन व्यवस्था, पाइपलाइन तसेच इतर साहित्याचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे चोपडे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे. सदर एल.टी. मुख्य वीज लाइन गट क्रमांक 159 मधून भेड येथून होळे मार्गे वरवडे येथे विद्युत पुरवठा करते. स्थानिकांच्या मते ही घटना प्रथमच घडलेली नसून यापूर्वीही याच लाईनमुळे ऊस आणि एक म्हैस जळाल्याची घटना घडली होती. त्यावेळी पंचनामा करण्यात आला होता; मात्र आजतागायत कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही.

Marathi News Esakal
www.esakal.com