वेल्हे : राजगड तालुक्यातील कोदवडी फाटा परिसरात असलेल्या श्रीनाथ हॉटेलमध्ये रविवार (ता.24)रोजी रात्री उशिरा धक्कादायक प्रकार घडला..जुन्या वादातून आरोपीने पिस्टलमधून गोळीबार करत कोयत्याने हल्ला केल्याने हॉटेल मालक आणि वेटर गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात सोमवार (ता.२५) रोजी सकाळी 9 वाजण्याचा सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वेल्ह्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांनी दिली..याप्रकरणी मस्कु तानाजी दसवडकर (वय 41,रा.अस्कवडी, ता.वेल्हे) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गणेश धरपाळे (रा.वांजळे,ता.राजगड) व त्याच्या चार अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार रात्री 10 ते 10.20 वाजण्याच्या सुमारास वेल्हे-नसरापूर रोडवरील कोदवडी फाटा येथील श्रीनाथ हॉटेलमध्ये फिर्यादी, त्यांची पत्नी तसेच वेटर दशरथ शिळीमकर आणि त्यांची पत्नी उपस्थित होते. त्यावेळी आरोपी गणेश धरपाळे याने दोन महिन्यांपूर्वी हॉटेलमध्ये जेवण न दिल्याचा राग मनात धरून हॉटेलमध्ये धुडगूस घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपीने पिस्टलमधून फिर्यादी आणि वेटरवर जीवघेणा गोळीबार केला. मात्र ते थोडक्यात बचावले त्यानंतर कोयत्याने फिर्यादीच्या मांडी व कपाळावर वार करून जखमी केले. तसेच वेटर दशरथ शिळीमकर यांच्या जबड्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले..यावेळी आरोपी व त्याच्या साथीदारांनी हॉटेलमधील खुर्च्या, फ्रिज यांची तोडफोड केली तसेच हॉटेलसमोरील MH- 12- MG- 3757 क्रमांकाची स्कुटी लाथ मारून नुकसान केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणावरून राजगड तालुक्यामध्ये नागरिकांमध्ये तसेच हॉटेल चालकांवर भीतीचे सावट निर्माण झाले असून संबंधित गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे..या प्रकरणी वेल्ह्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख करत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.