बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 
गणेश धुपे याचे यश

बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गणेश धुपे याचे यश

Published on

नसरापूर, ता. ३१ ः पुणे जिल्हा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवांतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा–२०२६ नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धांमध्ये बुद्धिबळ स्पर्धेत लहान गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोंढणपूर येथील इयत्ता चौथीमधील विद्यार्थी गणेश धुपे याने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.
जिल्हा पातळीवरील या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील तेरा तालुक्यामधील तेरा विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामधून गणेश धुपे याने उत्कृष्ट खेळ करत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला गणेशच्या या यशामागे शाळेतील शिक्षकांनी दिलेले सातत्यपूर्ण मार्गदर्शन व विशेष प्रशिक्षण मोलाचे ठरले. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हवेली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे, शिक्षण विस्तार अधिकारी धानापुने, केंद्रप्रमुख राजेंद्र जाधव तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सविता क्षिरसागर व वर्गशिक्षक रवींद्र पारसे यांनी त्याचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com