
पुणे : प्रसाद बनविणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता बाळगावी. गणेश मंडळांनी भाविकांसाठी तयार केलेला प्रसाद हा काचेच्या भांड्यात किंवा पारदर्शक प्लॅस्टीकच्या भांड्यात झाकून ठेवावा. या प्रसादाला धुळ, माती, माशा, मुंग्या या इतर किटकांचा प्रादुर्भाव होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तसेच भाविकांना शिळे अन्नपदार्थ सेवनास देऊ नयेत, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) दिल्या आहेत.