साधेपणा, सामाजिक उपक्रमांवर भर

साधेपणा, सामाजिक उपक्रमांवर भर
Published on

पिंपळे गुरव, ता. २० ः कासारवाडी परिसरात गणेश मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवात साधेपणा, पारंपरिक संस्कृती आणि सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. काही मंडळांनी आकर्षक देखावे उभारले असून, अनेक मंडळांकडून अन्नदान, महाप्रसाद, रक्तदान, आरोग्य तपासणी तसेच वर्षभर सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. पर्यावरणपूरक सजावटीलाही मंडळांनी महत्त्व दिले आहे.

साधेपणाने उत्सव
जय महाराष्ट्र व्यायाम मंडळाचा ६१ वा गणेशोत्सव असून अध्यक्ष अमित लांडे आहेत. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ अन्नदान करण्यात येणार असून, साधेपणाने उत्सव साजरा केला जात आहे.
सुवर्ण पिंपळ मित्र मंडळाचा २७ वा उत्सव असून, अध्यक्ष युवराज पिंपळे आहेत. मंडळाने साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे.
शिवस्पर्श प्रतिष्ठान, शीतलादेवी मित्र मंडळाचा ४० वा उत्सव असून, अध्यक्ष साहिल शेख आहेत. अनाठायी देखाव्यांचा खर्च टाळून सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे.
शिवप्रेमी मित्र मंडळाचा ४७ वा उत्सव असून, अध्यक्ष शशिकांत घावटे आहेत. लहान मुलांच्या स्पर्धा, संगीत खुर्ची, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, अन्नदान आणि पारंपरिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रेल्वे फाटकाजवळील आझाद मित्र मंडळाचा ४६ वा उत्सव असून, अध्यक्ष विनय बिराजदार आहेत. महाप्रसाद आणि लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
जयहिंद तरुण मंडळाचा ६७ वा उत्सव असून, अध्यक्ष मयूर जवळकर आहेत. ‘होम मिनिस्टर’, नृत्य स्पर्धा, गायनाचा कार्यक्रम तसेच एनसीएमसी स्मार्ट कार्ड उपक्रम राबविण्यात येत आहे.
जवळकर कॉलनीतील श्रीकृष्ण मित्र मंडळाचा ४७ वा उत्सव असून, अध्यक्ष शिवराम दळवी आहेत. साधेपणाने गणेशोत्सव साजरा करत वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
श्री सोमेश्वर मित्र मंडळाकडून गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मंडळाचे ५२ वे उत्सव असून, अध्यक्ष मच्छिंद्र सोमवंशी आहेत.
जाणता राजा ग्रुप मंडळाचे दहावे वर्ष असून, अध्यक्ष अरबाज सैय्यद आहेत. भजन, लहान मुलांच्या स्पर्धा, निबंध आणि ऐतिहासिक विषयांवरील स्पर्धा घेण्यात येतात.
अभिनव मित्र मंडळाचा ४७ वा उत्सव असून, अध्यक्ष विलास पवार आहेत. ‘कासारवाडीचा अधिपती’ म्हणून गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक सजावट, महाप्रसाद, सामाजिक उपक्रम आणि पारंपरिक विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
जनसेवा तरुण मंडळाचा ४७ वा उत्सव असून, अध्यक्ष प्रशांत पाटणे आहेत. मंडळाने ‘शिव तपवन’ हा देखावा साकारला आहे.
नवनाथ मित्र मंडळाचा ५२ वा उत्सव असून, अध्यक्ष राजीव पठारे आहेत. जागेच्या अभावामुळे साधेपणाने उत्सव साजरा करण्यात येत असून, बालाजी मंदिराचा देखावा साकारला आहे.
गारजाई मित्र मंडळाचा ४७ वा उत्सव असून महाप्रसाद, भजन, लहान मुलांच्या स्पर्धा, नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. अध्यक्ष संतोष नानक आहेत.
केशवनगर येथील एकता मित्र मंडळाचा ३३ वा उत्सव असून, अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे आहेत. महाप्रसाद, सामाजिक उपक्रम, लहान मुलांच्या स्पर्धा, मर्दानी खेळ आणि पारंपरिक विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
‘शास्त्रीनगराचा राजा’ अशी ओळख असलेल्या श्री गणेश मित्र मंडळातर्फे लहान मुले व महिलांसाठी विविध उपक्रम, अथर्वशीर्ष पठण तसेच वर्षभर सामाजिक उपक्रम राबविले जातात. मंडळाचे यंदाचे ३९ वे वर्ष असून, अध्यक्ष रमेश देवरुखकर आहेत.
सिद्धिविनायक मित्र मंडळाचा १९ वा उत्सव असून, अध्यक्ष महेश पुजारी आहेत. फुलांची आरास करण्यात आली असून, लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, विविध खेळ तसेच महिलांसाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले आहे.
कुंदननगर मित्र मंडळाचे यंदाचे २४ वे वर्ष असून अध्यक्ष, मार्गदर्शक कपिल अगरवाल, जयदीप लुनिया आहेत.
यावर्षी सुबक अशी फुलाची आरस तयार केली आहे.
एकदंत मित्र मंडळाने सोनेरी राजवाड्याचा देखावा साकारला आहे. मंडळाचे २३ वे वर्ष असून
अध्यक्ष अनिकेत परदेशी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com