निर्मल टाऊनशिपचा "सकाळ सोसायटी गणपती'''' उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

निर्मल टाऊनशिपचा "सकाळ सोसायटी गणपती'''' उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Published on

हडपसर, ता. २१ : भक्ती, उत्साह आणि कौटुंबिक वातावरणात विविध कार्यक्रम व उपक्रम राबवीत काळेपडळ येथील निर्मल टाऊनशिपमधील रहिवाशांनी ‘सकाळ सोसायटी गणपती’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोसायटीतील आबालवृद्धांना एकत्र आणून विविध स्पर्धा, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी पर्वणी त्यानिमित्ताने रहिवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नियोजनबद्ध समन्वयाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोसायटी मंडळाचे हे ३० वे वर्ष आहे.

टाऊनशिप मध्ये १०५० मिळकतदार आहेत. बारा सोसायटींची मिळून अपेक्स समिती आहे. या समितीने १९९६ पासून गणेशोत्सव सुरू केला आहे. दरवर्षी या काळामध्ये सोसायटीकडून भरगच्च कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी मंडळाचे अध्यक्ष गणेश ठाकर, उपाध्यक्ष विवेक नवले, सचिव सचिन चोपडे, कार्याध्यक्ष गणेश कोहिणकर, कार्यकारणी सदस्य नितीन चोपडे, मयूर मते, प्रतीक पुंडे, ओम देशमुख, निखिल साळुंके हे आहेत.

सोसायटीने सौर ऊर्जा प्रकल्प राबवून आवश्यक वीज निर्मिती केली आहे. सोसायटीत जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्यातून भारत फोर्ज आणि नोव्हा फाउंडेशनच्या वतीने गांडूळ खत निर्मिती केली जाते. अपेक्स समितीचे अध्यक्ष जालिंदर बोरकर, सचिव गिरीश अग्रवाल व खजिनदार सतीश वलटे हे काम पाहत आहेत.

संगीत खुर्ची, फॅन्सी ड्रेस, पोत्यातल्या उड्या, स्लो सायकलिंग, बॉक्स क्रिकेट स्पर्धा, होम मिनिस्टर, निर्मल जत्रा, ज्येष्ठांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व विसर्जन मिरवणूक असे कार्यक्रम सोसायटीने आयोजित केले आहेत. या कार्यक्रमांनाही सभासद व पाल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com