Pune Metro : गणेशोत्सवात पुणे मेट्रोच्या वेळेत वाढ; भाविकांसाठी विशेष व्यवस्था
Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रोने स्वारगेट-पिंपरी आणि वनाज-रामवाडी मार्गांवरील फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे : शहरातील गणेशोत्सवाच्या काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन, स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि वनाज- रामवाडी मार्गावर मेट्रोच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे.