गणेशभक्तांसाठी पालिकेचा ‘रोडमॅप’ तयार

गणेशभक्तांसाठी पालिकेचा ‘रोडमॅप’ तयार
Published on

GHR26A09364
संगमनेर ः गणेशोत्सव मिरवणुकीस अडथळा ठरणाऱ्या वृक्षांच्या फांद्या जेसीबीच्या माध्यमातून तोडताना कर्मचारी.

GHR26A09365
टीप- कोटमध्ये मैथिली तांबे फोटो घेणे

निर्विघ्न मिरवणुकीसाठी प्रशासन सरसावले
संगमनेर, ता. १३ ः शहरात गणेशोत्सव शांततेत पार पडावा, तसेच गणेश मंडळांना मिरवणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका प्रशासनाने धोकादायक झालेल्या ४५२ वृक्षांच्या फांद्यांची छाटणी केली. याशिवाय शहरातील २१ रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले असून, आवश्यक ठिकाणी काँक्रिटचे पॅचवर्क करण्यात आले आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा डॉ. तांबे यांनी काही दिवसांपूर्वी शहरातील निश्चित करण्यात आलेल्या मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. यावेळी त्यांनी मिरवणूक मार्गावरील रस्ते, पथदिवे, वृक्षांच्या फांद्या, खड्डे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सुविधांचा आढावा घेतला. गणेश भक्तांना मिरवणुकीदरम्यान कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या होत्या.
त्यानुसार पालिका प्रशासनाकडून मिरवणूक मार्गाची साफसफाई व डागडुजी, खड्डे बुजविणे, आवश्यक ठिकाणी काँक्रिट पॅचवर्क करणे आणि पथदिव्यांची व्यवस्था सुरळीत ठेवण्याची कामे करण्यात आली आहेत.
गणेशोत्सव काळात शहरातील विविध गणेश मंडळांकडून आकर्षक आरास व देखावे साकारले जातात. हे देखावे पाहण्यासाठी संगमनेर शहरासह ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी रस्त्यावर वाहने उभी न करता त्यांच्यासाठी शहरातील विविध भागांत आठ ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोट-
गणेशोत्सव भव्य, सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात पार पडावा, यासाठी नगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे. गणेश मंडळांना येणाऱ्या अडचणींची तातडीने दखल घेऊन त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी नगरपालिका प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.

- डॉ. मैथिली तांबे, नगराध्यक्षा, संगमनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com