

राहू, ता. २२ : मिरवडी- मेमाणवाडी येथील रायबा युवा मित्र मंडळासह राहू, खामगाव, पिंपळगाव परिसरासह दौंडच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गणेश मंडळांनी यंदा सामाजिक उपक्रम राबविण्यावर अधिक भर दिला आहे. उत्सवाच्या निमित्ताने व्याख्याने, कीर्तन आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडले.
मिरवडी-मेमाणवाडी येथे मंगळवारी (ता. १५) श्रीकृष्ण महाराज जोगदंड यांचा समाजप्रबोधनपर कार्यक्रम झाला. बुधवारी (ता. १६) यशवंत गोसावी यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा समाज’ यावर व्याख्यान, गुरुवारी (ता. १७) तेजस टेंगले यांच्यातर्फे ‘होम मिनिस्टर’, शुक्रवारी (ता. १८) भारत महाराज थोरात यांचे व्याख्यान, शनिवारी (ता. १९) शिवलीला पाटील यांचे कीर्तन, रविवारी (ता. २०) दत्तात्रेय वारे यांचे व्याख्यान, सोमवारी (ता. २१) गणेश महाराज फरताळे यांचे कीर्तन, तर मंगळवारी (ता. २२) वसंत हंकारे मार्गदर्शन झाले. बुधवारी (ता. २३) शिवानी शिंदे यांचा लोकगीतांचा कार्यक्रम होणार असून गुरुवारी (ता. २४) लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
या उपक्रमांसाठी जिल्हा परिषद सदस्य सागर शेलार, सोमनाथ शेलार, बाळासाहेब शिंदे, संजय कोंडे, शांताराम थोरात, दादासाहेब थोरात, सचिन वारे, सागर कोंडे, योगेश सावंत, अजय मेमाणे, बापू शेलार, अजय शेलार, शिवाजी शिंगाडे व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.