पुणे : मंदिर नसलेल्या गणेश मंडळांचा प्रश्‍न निकाली

Ganesh Mandals without temples are allowed to pavilion by pune police
Ganesh Mandals without temples are allowed to pavilion by pune police

पुणे : " ज्या मंडळांना स्वत:चे मंदिर नाही अथवा बंदिस्त जागेत गणेशोत्सव करता येणार नाही. अशा मंडळांना विशेष बाब म्हणून छोटे मंडप टाकण्यासाठी परवानगी दिली जाईल,' असे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी स्पष्ट केले. मागील वर्षी ज्या मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. त्याच मंडळांनाच ही परवानगी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मोठी बातमी : पुण्यात कोरोना रुग्णांबाबत नोंदविले गेलेत दोन रेकॉर्ड; वाचा सविस्तर​ 

शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन महापालिका आणि पोलिसांनी केले होते. तसेच यंदाच्या वर्षी मंडळाने मंदिरातच 'श्री'ची प्रतिष्ठापना करावी, असे सांगण्यात आले होते. परंतु शहरातील अनेक छोट्या मंडळांचे गणेश मंदिर नाही, अशा मंडळापुढे प्रश्‍न निर्माण झाला होता. विशेषतः पूर्व भागातील काही मंडळांनी एकत्र येऊन गेल्या आठवड्यात बैठक घेत छोटा मंडप टाकण्यासाठी तरी परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. ही मागणी विचारात घेऊन पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. मात्र दरवर्षी मंडपाएवढा मंडप उभारता येणार नाही, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. 

पुणे जिल्ह्यातील नागरिकांनो सतर्क राहा; हवामान विभागानं दिलाय 'ऑरेंज अलर्ट'!​

यासंदर्भात डॉ. शिसवे म्हणाले," गेल्या वर्षी ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी परवानगी देण्यात आली होती. तीच परवानगी या वर्षी ग्राह्य धरण्यात येणार आहे. परंतु गेल्या वर्षी जेवढा मंडप टाकला होता. तेवढ्या आकाराचा मंडप टाकता येणार नाही. मंडपाच्या ठिकाणी मंडळांनी सर्व सुरक्षिततेच्या उपयोजना करावेत. काही अडचण असल्यास मंडळांनी त्यांच्या परिसरातील पोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधावा.''  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com