

गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेसाठी वाहतूक मार्गात बदल
खरेदीसाठी गर्दीच्या पार्श्वभूमीवर पर्यायी मार्ग; १३ ते १९ सप्टेंबरपर्यंत आदेश लागू
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ११ : गणेशोत्सव व गौरी-गणपती आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केले आहेत. १३ ते १९ सप्टेंबरपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.
गणेशमूर्ती प्रतिष्ठापना तसेच पूजेचे साहित्य खरेदीसाठी मधला मारुती, टिळक चौक, कोंतम चौक, माणिक चौक, मंगळवार पेठ पोलिस चौकी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे या मार्गांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. अपघात टाळण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी या मार्गांवरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलिसांची व अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता अन्य कोणत्याही वाहनांना या मार्गांवरून प्रवेश करता येणार नाही. आदेशाचा भंग करून गर्दीतून वाहन चालविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.
------------------------------------
बंद मार्ग :
टिळक चौक, मधला मारुती, कोंतम चौक, माणिक चौक आणि मंगळवार पेठ पोलिस चौकी परिसर.
------------------------------------
पर्यायी मार्ग :
बाळीवेस, बीएसएनएल ऑफिस, मंगळवार पेठ पोलिस चौकी, कुंभार वेस ते कोंतम चौक, तसेच टिळक चौक, जुनी कसबा पोलिस चौकी, माणिक चौक या मार्गांचा वापर करता येईल.
------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.