मटण, चिकन, गावरान अंडीचे भाव टिकून

मटण, चिकन, गावरान 
अंडीचे भाव टिकून
Published on

मार्केट यार्ड, ता. १ : देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीहून गणेश पेठ येथील मासळी बाजारात मासळी दाखल होत आहे. बाजारातील आवक जावक कायम असल्याने गत आठवड्यातील भाव कायम आहेत. इंग्लिश अंड्याच्या मागणीत घट झाल्याने भावात शेकड्यामागे वीस रुपयांनी घट झाली आहे. मटण, चिकन आणि गावरान अंडीचे भाव टिकून आहे.

बाजारात रविवारी (ता. १) खोल समुद्रातील मासळी १० ते १५ टन, खाडीच्या मासळीची सुमारे १५० ते २०० किलो आणि नदीच्या मासळीची ५०० ते ७०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे १५ टन इतकी आवक झाली होती. खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) - पापलेट : कापरी : १८००-२०००, मोठे : १६००-१८००, मध्यम : १३००-१५००, लहान : ११००-१२००, भिला : १०००-११००, हलवा : ६५०-८००, सुरमई ८००-१०००, रावस : ७५०-८५०, घोळ : ९००-१०००, करली : ३५०-४००, करंदी : ४५०-५००, भिंग : ४००-५००, पाला : ९००-१२००, वाम : पिवळी ८००-१२००, काळी : २५०-३५०, ओले बोंबील : ३००-४००. कोळंबी : लहान : ३२०-४००, मोठी : ४५०-७००, जम्बो प्रॉन्स : १४००-१५००, किंग प्रॉन्स : ७५०-८५०, लॉबस्टर : १८००-२२००, मोरी : ३५०-४००, मांदेली : १२०-१६०, राणीमासा : २५०-३००, खेकडे : ३५०-४५०, चिंबोऱ्या : ६५०-७५०. खाडीची मासळी - सौंदाळे : २५०-३००, खापी : ३५०-४००, नगली : ५५०-६००, तांबोशी : ५५०-६५०, पालू : २४०-२८०, लेपा : ३५०-४००, बांगडा : २००-२४०, शेवटे : ३५०-४००, पेडवी : १५०-२००, बेळुंजी : १४०-१६०, तिसऱ्या : २५०-३००, खुबे : १२०-१५०, तारली : २००-२४०. नदीतील मासळी : रहू : १४०-१८०, कतला : १६०-२००, मरळ : ३५०-४५०, शिवडा : १५०-२००, खवली : २००-२५०, आम्ळी : १४०-१६०, खेकडे : २५०-४००, चिलापी : ६०-१६०, वाम : ४५०-५५०. मटण : बोकडाचे ८००, बोलाईचे ८००, खिमा ८००, कलेजी ८४०. चिकन २४०, लेगपीस ३००, जिवंत कोंबडी १८०, बोनलेस ३४०. अंडी : गावरान (शेकडा) १२२० डझन १५०, प्रतिनग १४. इंग्लिश (शेकडा) ५७५, डझन ७८, प्रतिनग ६.५०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com