सर्व प्रकारच्या मासळीची आवक कमी
मार्केट यार्ड, ता. १ : गणेश पेठ येथील बाजारात सर्व प्रकारच्या मासळीची आवक कमी झाली आहे. त्या तुलनेने मागणी अधिक असल्याने सर्व प्रकारच्या मासळीचे गेल्या आठवड्यातील तेजीतील भाव टिकून होते. बाजारात पक्ष्यांचा पुरवठा सुरळीत आणि मागणी प्रमाणात असल्याने चिकनच्या दरात किलोमागे वीस रुपयांनी घट झाली होती. तर, गावरान अंडीच्या शेकडा भावात १०० रुपयांनी घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे मटण, इंग्लिश अंडीचे गेल्या आठवड्यातील दर टिकून होते.
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. १) खोल समुद्रातील मासळी १० ते १५ टन, खाडीच्या मासळीची सुमारे २०० ते २५० किलो आणि नदीच्या मासळीची २०० ते ४०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे २० ते २५ टन इतकी आवक झाली, अशी माहिती गणेश पेठ मासली बाजारातील मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन-अंड्याचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) - पापलेट : कापरी : २२००-२४००, मोठे : १८००-२०००, मध्यम : १४००-१५००, लहान : १०००-१२००, भिला : ९००-१०००, हलवा : ७००-८००, सुरमई ८००-१२००, रावस : ९००-१०००, घोळ : ९००-१०००, करली : ३००-४००, करंदी : ४५०-५००, भिंग : ४००-५००, पाला : १०००-१४००, वाम : पिवळी १०००-१२००, काळी : ३००-४००, ओले बोंबील : ४००-५००. कोळंबी : लहान : २००-३२०, मोठी : ७००-८००, जम्बो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स : ९००-१०००, लॉबस्टर : २०००-२२००, मोरी : ३००-४००, मांदेली : १००-१६०, राणीमासा : २५०-३६०, खेकडे : ३००-४००, चिंबोऱ्या : ७००-८००. खाडीची मासळी - सौंदाळे : २५०-३६०, खापी : २५०-३६०, नगली : ५००-६००, तांबोशी : ५००-६००, पालू : २५०-३००, लेपा : ३००-४००, बांगडा : २५०-३००, शेवटे : २५०-३००, पेडवी : १५०-२००, बेळुंजी : १५०-२००, तिसऱ्या : ३००-३५०, खुबे : १००-१५०, तारली : २००-२५०. नदीतील मासळी : रहू : १६०-१८०, कतला : २००-२२०, मरळ : ४००-५००, शिवडा : २००-२५०, खवली : २००-२५०, आम्ळी : १२०-१६०, खेकडे : २५०-४००, चिलापी : ८०-१५०, वाम : ५५०-६००. मटण : बोकडाचे ८००, बोलाईचे ८००, खिमा ८००, कलेजी ८४०. चिकन २५०, लेगपीस ३२०, जिवंत कोंबडी १८०, बोनलेस ३५०. अंडी : गावरान (शेकडा) १३०० डझन १६८, प्रतिनग १४. इंग्लिश (शेकडा) ५७०, डझन ७८, प्रतिनग ६.५०.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

