गणपती

गणपती
Published on

स्‍वातंत्र्यदिनी झाला आगमनाचा दणदणाट

गणेश मंडळांच्‍या मिरवणुकांमुळे प्रमुख मार्गांवर ताण; वाहतुकीचा खोळंबा

सातारा, ता. १६ : स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांची शहरात काल लगबग सुरू असतानाच काही गणेश मंडळांनी आगमन सोहळे काढल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागला. तिरंगा रॅली, विविध उद्‌घाटने आणि अन्य कार्यक्रमांमुळे आधीच प्रमुख मार्गांवर वाहतुकीचा ताण होता. त्यात मिरवणुकांची भर पडल्याने वाहतूक विस्कळित झाली होती. त्यामुळे गणेश मंडळांनी शिस्त पाळून रस्ते अडणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समितीने चार दिवसांपूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांची भेट घेतल्यानंतर गणेश आगमन सोहळ्याच्या तारखांवर एकमत केले होते. त्यानुसार २९ व ३० ऑगस्ट, तसेच ८, ९ आणि ११ सप्टेंबर या पाच तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शहरात विविध कार्यक्रम सुरू असतानाही काही मंडळांना वाद्यांसह आगमन सोहळ्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे शहरातील नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. पुढील काळात निश्चित केलेल्या पाच दिवसांमध्येच आगमन सोहळ्यांना परवानगी दिली जावी, अशी अपेक्षा अनेक नागरिकांनी व्‍यक्‍त केली. नागरिक, व्यापारी, गणेश मंडळे आणि प्रशासन यांच्यात समन्वय राहावा, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्‌भवू नये, यासाठी समिती व पोलिसांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षाही ज्‍येष्‍ठांसह महिलांनी व्‍यक्‍त केली.
..........
कोट
गणेशोत्सव मंडळांच्या समन्वय समितीने पाच तारखा निश्चित केल्या होत्या; परंतु दोन मंडळांनी आधीच वाद्यांचे बुकिंग केल्याने समन्वय समितीने ती मान्य केली होती. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक व शाहूपुरी पोलिस ठाण्याच्‍या निरीक्षकांना निर्णय घेण्यास सांगितले होते. या मंडळांव्यतिरिक्त आणि कोणालाही संबंधित समितीने ठरवून दिलेल्या तारखांची परवानगी दिली जाणार नाही. मंडळांनी पाच तारखांनाच आगमन सोहळे साजरे करून सहकार्य करावे.
- निखिल पिंगळे
पोलिस अधीक्षक, सातारा
..............................................
PNE26W42509
सातारा : शहरात गणेश मंडळांनी गुरुवारी रात्री काढलेल्‍या आगमन मिरवणुका. (प्रमोद इंगळे : सकाळ छायाचित्रसेवा)
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com