पुणे - गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदाही मानाचे गणपती परंपरेप्रमाणे निश्चित वेळेनुसार ठराविक मार्गाने मुख्य मिरवणुकीत सहभागी होतील. मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून शनिवारी (ता. ६) सकाळी साडेनऊ वाजता विसर्जन सोहळ्यास भक्तीमय आणि उत्साहाच्या वातावरणात प्रारंभ होईल.