Ganesh Visarjan Preparations Remain Only on Paper Nirmalya Kalash Bins Go Missing
sakal
पुणे - गणेशोत्सवाची आणि गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासन करत आहे. पण विसर्जन करताना निर्माल्य टाकायचे कुठे? असा प्रश्न भाविकांसमोर निर्माण झाला आहे. महापालिकेने लाखो रुपये खर्च करून विकत घेतलेले निर्माल्य कलश विसर्जन घाट व पुलांवरून गायब झाले आहेत. या अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.