
भोर : पोलिस ठाणे अंतर्गत भोर शहरासह इतर गावांमधील एकूण १७ जणांवर तालुका प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली. गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगळवारी (ता.२) आणि शनिवारी (ता.६) या दोन दिवसांसाठी १७ जणांना पोलिसांनी शहर आणि त्यांच्या गावातून हद्दपार केले आहे. पोलिसांचे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक आणि भोर पोलिस ठाण्यातील साध्या विषयातील पोलिस त्यांच्यावर देखरेख ठेवणार आहेत.