जुन्नर- मढ मार्गावरील प्रवास ठरतोय धोक्याचा

मीननाथ पानसरे
Wednesday, 2 September 2020

जुन्नर ते मढ या मार्गावरील गणेशखिंड येथे मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे छोट्या प्रमाणात दरड कोसळल्या आहेत. त्यामुळे गणेशखिंड मार्ग प्रवासासाठी धोकादायक झाला आहे.

आपटाळे (पुणे) : जुन्नर ते मढ या मार्गावरील गणेशखिंड येथे मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे छोट्या प्रमाणात दरड कोसळल्या आहेत. त्यामुळे गणेशखिंड मार्ग प्रवासासाठी धोकादायक झाला आहे. प्रशासनाने तातडीने सुरक्षेची उपाययोजना राबवावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जुन्नरपासून मढ, सीतेवाडी, तळेरान, कल्याण, मुंबईकडे जाण्यासाठी जुन्नरहून दोन मार्ग आहेत. जुन्नर, गोळेगाव बनकर फाटा मार्गे मढ हा एक मार्ग, तर जुन्नर, पिंपळगाव सिद्धनाथ, गोद्रे, गणेशखिंड मार्गे मढ हा दुसरा मार्ग आहे. गणेशखिंड मार्ग हा जवळचा मार्ग म्हणून ओळखला जातो. मोठ्या प्रमाणावर खासगी, प्रवासी व मालवाहतूक या मार्गाने होत असते. 

पुणे जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटेना

वळणावळणाचा घाटमार्ग असलेल्या गणेशखिंड भागात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे गणेश मंदिराच्या पुढील बाजूस मातीचा ढिगारा डोंगरावरून कोसळलयाची घटना सोमवारी (ता. 31) घडली. छोट्या मोठ्या दरडी कोसळण्याच्या घटना भविष्यात घडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हा मार्ग प्रवाशांच्या दृष्टीने धोकादायक होत चालला आहे.  प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशी करत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Ganeshkhind road from Junnar to Madh is dangerous for commuters